यंदापासून इ.१० वी चा अभ्यासक्रम राज्य मंडळातर्फे बदलण्यात आल्यानंतर मार्च २०१९ ला होणाऱ्या बीजगणित आणि भूमितीच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा देखील जाहिर झाला असून त्याचा अभ्यास केला असता सदर आराखड्या नुसार गणितात पास होणे सोपे झाले असले तरी प्रश्नपत्रिकेतील ४० पैकी 4 गुणांचा एक उपप्रश्न पुस्तकेतील संकल्पनांवर आधारीत मात्र पुस्तका बाहेरचा विचारण्यात येणार असून 3 गुणाचा एक प्रश्न भाषा विषयाप्रमाने स्वमतावर आधारीत असल्याने विद्यार्थ्यांचा पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी कस लागणार आहे. तर पहिला 8 गुणाचा प्रश्न देखील 9 वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार हे स्पष्ट झाल्याने 9 वी पासूनच 10 वी च्या तयारी ला सुरवात करावी लागणार आहे.
मंडळातर्फे यंदा पासून देण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात मागील पाठ्यपुस्तकांचा विचार केला तर बर्यापैकी भाग आणि उदाहऱणे वगळण्यात आली आहेत.पाठ्यपुस्तक देखील आकर्षक करण्यात आले आहे.बहुतांश पाठ्यांश देखील सारखेच आहेत.बीजगणिता मध्ये समाविष्ठ केलेले जीएसटी,शेअर्स आणि म्युच्यूअल फंड वर आधारीत भागांमुळे दैनंदीन व्यवहारानिगडीत पुस्तकाचा हेतू अभिनंदनीय आहे.प्रत्येक पाठानंतर क्यू आर कोड दीले आहेत .त्यामुळे त्याच्या स्कॅनींग नंतर विद्यार्थी आणि शिक्षकांना पाठासंबधीत अधिकची माहीती आणि काही दृकश्राव्य प्रकारातील शैक्षणीक साहीत्य देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.
💥मूल्यमापनात पूर्णता बदल
मार्च २०१९ ला नव्या अभ्यासक्रमानुसार प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णतः बदललेल्या प्रश्नपत्रिकेला आणि मूल्यमापन पद्धतिला सामोरे जावे लागणार आहे. वर्षभरात प्रथम आणि द्वितीय सत्रात बीजगणित आणि भूमितीची प्रत्येकी वीस गुणांची चाचणी घेण्यात येईल.ह्या ८० पैकी मिळणारे गुण १० गुणात रुपांतरीत करण्यात येणार आहेत. तर देान्ही विषयांसाठी प्रत्येकी ५ गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. या प्रमाणे चाचणी चे रुपांतरीत १०आणि प्रात्यक्षिकाचे एकत्रीत १० असे वीस गुण अंतर्गत गुण म्हणून देण्यात येणार आहेत. उर्वरीत ८० गुणांसाठी बीजगणित आणि भूमिती अशी स्वतंत्र ४० गुणांची अंतिम परीक्षा द्यावी लागणार आहे.
💥अशी असेल प्रश्नपत्रिका
मार्च २०१९ ला बीजगणित आणि भूमितीसाठी होणाऱ्या प्रत्येकी 40 गुणांच्या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सारखेच असेल. पहिला प्रश्न ८ गुणांचा असून हा प्रश्न इ.९ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.त्यात अ भागात प्रत्येकी १ गुणाचे सहा पैकी चार उपप्रश्न सोडवावे लागतील. तर ब भागात प्रत्येकी २ गुणांचे तीन पैकी दोन उदाहरणे सोडवावी लागतील. दुसऱ्या प्रश्नाच्या अ भागात प्रत्येकी १ गुणासाठी चार बहुपर्यायी प्रश्न असतील. तर ब भागात प्रत्येकी २ गुणांसाठी तीन पैकी दोन उपप्रश्न विचारण्यात येतील.
तिसऱ्या प्रश्नाच्या अ भागातील प्रत्येकी दोन गुण असलेल्या तीन पैकी दोन कृती (भाषा विषयांप्रमाणे) सोडवाव्या लागतील तर ब भागात प्रत्येकी 2 गुणांचे तीन पैकी 2 उदाहरणे सोडवावे लागणार असून या उपप्रश्नांची काठिन्य पातळी उच्च असणार आहे.४ था प्रश्न ९ गुणांचा असून त्यात प्रत्येकी ३ गुणांचे चार पैकी तीन उपप्रश्न सोडवावे लागतील.प्रश्न क्रमांक ५ आणि ६ वर विद्यार्थ्यांना पैकी च्या पैकी गुण मिळतील की नाही हे साधारणता ठरणार आहेत.पाच व्या प्रश्नात चार गुणांसाठी दोन पैकी एक प्रश्न सोडवायचा असला तरी हे उपप्रश्न अभ्यासक्रमावर आधारीत परंतू पुस्तका बाहेरचे असणार आहेत.तर ६ वा प्रश्न तीन गुणांचा असून दोन पैकी एक उपप्रश्न सोडवावा लागणार असून हे प्रश्न देखील रचनात्मक आणि विद्यार्थ्यांच्या स्वमतावर (भाषा विषयांप्रमाणे) आधारीत असल्याने यात देखील विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.त्यात प्रामुख्याने आकृती काढणे,अपूर्ण रचना पूर्ण करणे,माहीती च्या आधारे प्रश्न तयार करणे,दिलेल्या उताऱ्यावरून गणितीय माहितीवरील प्रश्न तयार करणे आदी बाबींचा समावेश असणार आहे.
💥यंदा पासून इ.९ वी साठी देखील उपरोक्त प्रश्नपत्रिका आराखडा वापरण्यात येणार आहे.*
*९ वी च्या पहील्या सत्राच्या प्रश्नपत्रिकेत पहीला प्रश्न इ.८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल तर दुसर्या सत्रातील प्रश्नपक्षिकेतील पहीला प्रश्न इ.८ वी आणि ९ वी च्या प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे.
No comments:
Post a Comment