सुमेधा...शॉर्ट मध्ये सुमा....MBA च्या कोर्समूळे महेशला भेटली...महेशने नुकतेच engineeing पूर्ण केले होते...सुमाने HR तर महेशने ओपरेशन मॅनेजमेंट साठी ऍडमिशन घेतले होते....हळूहळू त्यांची मैत्री झाली...आणि त्यापुढे प्रेम कसे झाले त्या दोघांनाही कळाले नाही...MBA पूर्ण झाल्यानंतर आपसूकच दोघांच्याही घरात त्यातल्या त्यात सुमाच्या घरात तिच्या लग्नाचा विषय डोकं वर काढू पाहत होता...दोघांनीही आपल्या प्रेमाची कल्पना आपापल्या घरी दिली...आणि व्हायचा तेव्हढा विरोध दोघांच्याही घरून झाला..
"सुमा दिसायला महेशला साजेशी नाही...थोडी उंची कमी आणि स्थूल आहे...आपल्या महेश कितीतरी चांगली मुलगी मिळेल!"
असं नाकडोळे मोडत महेशची आई म्हणायची...तर "महेशचं आता कुठे शिक्षण झालंय, तो अजून financially सेटल नाही!" असं सुमाच्या आई बाबांना वाटायचं...शेवटी दोघांच्याही घरच्यांना लग्नाला मान्यता द्यावीच लागली...आणि दोघांचं लग्न झालं...पण काहीशा नाखुशीतच!!
लग्नानंतरची दोन तीन वर्षे अगदी मजेत गेली...दोघांनाही एकमेकांशिवाय दुसरे कोणी दिसायचे नाही...माहेरी जाऊन राहणं तर सुमाला माहीतच नव्हतं!आपली मुलगी सासरी सुखात आहे हे पाहून सुमाच्या आईबाबांची नाराजीही कमी झाली होती...आणि महेश मूळे त्याची आई सुमाशी प्रेमाने वागत होती...पण आता घरात एका नवीनच वादाने जन्म घेतला होता....
लग्नाला चार पाच वर्षे लोटली होती...पण ही दोघे सगळ्यांना अपेक्षीत असलेली 'ती ' गुड न्युज काही देत नव्हते...याविषयी सुमाच्या सासूबाई महेशला अधून मधून विचारणा करायच्या...आणि महेश वेळ मारून न्यायला काहीतरी उत्तरं देऊन तेव्हढ्यापुरतं शांत करायचा...काही दिवसांनी दोघांनी डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केली..वेगवेगळ्या टेस्ट करून झाल्या...IVF च्या पाच दहा सायकल्स पण झाल्या....पण 'ती' गुड न्यूज काही केल्या येईना! प्रत्येक वेळी प्रेग्नन्सी टेस्ट किट आशेने आणली जायची...आणि त्यातली ती एक गुलाबी रेष 'गुड न्यूज' ऐवजी आणखी एकदा 'बॅड न्यूज' घेऊन यायची....आताआताशा दोघेही या बॅड न्यूजला कंटाळून गेले...कुठे लग्ना कार्यात जाणे मुश्किल झाले... जिथं जावं तिथं तोच प्रश्न...
"मग पेढे कधी?"
किंवा "अजूनही काहीच नाही का?"
"आम्हाला आजी/ आजोबा/ काका/ काकू/ मावशी कधी बनवणार?"
प्रश्न एकच... फक्त वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जायचा! जणू काही माणूस लग्न करतो ते फक्त मूल जन्माला घालायलाच! पण हे लोकांना काय सांगणार?
कुठे डोहाळे जेवण किंवा बारसं असेल तर सुमाला जाणीवपूर्वक टाळलं जायचं...तिला ही अशी वागणूक असह्य व्हायची...
एक दिवस महेशची आई त्याला ठसक्यातच म्हणाली,
"आमच्या मर्जीने एखाद्या दुसऱ्या मुलीशी लग्न केलं असतं; तर आतापर्यंत दोनदा आजी झाले असते मी!"
"आई,, बस्स...बस्स झाला तो विषय...अगं आम्ही आई बाबा होऊ शकलो नाही...यात एकट्या सुमाचा दोष आहे का? सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत...नसतं एकेकाच्या नशिबात आई बाप होणं...म्हणून काय आयुष्यभर कुढत बसणार आहेस का तू? बस्स...यापुढे 'बाळ' हा विषय या घरात बंद!!"
या सगळ्या गोष्टींचा दोघांनाही खूप मनस्ताप व्हायचा...एक दिवस महेशने सुमाला मूल दत्तक घेण्याविषयी तिचं मत विचारलं... पण या सगळ्या प्रकरणात दुखावलेली सुमा म्हणाली,
"महेश आपण मूल दत्तक घेतलं तरी काय होईल? सगळ्यांची तोंडं बंद होतील खरी...पण वांझोटी असल्याचा हा डाग कपाळावर कायम राहील...त्याचं काय?"
महेश सुमासाठीच हा विचार करत होता पण ती खचून गेली होती..
आणि बाळ मग ते दत्तक असो की स्वतःचं... त्या विषयावर पूर्णविराम आला होता...आता दोघेही एकमेकांची मनं जपत एकमेकांसाठी जगू लागले....
दिवसामागून दिवस जात होते....आता दोघेही आयुष्यात खूप पुढे गेले आणि पाहता पाहता दहा वर्षे लोटली...आणि एके दिवशी ऑफिसमध्ये काम करताना सुमाला चक्कर आली...डॉक्टरांनी "ती" टेस्ट करायला सांगितली होती... आणि सुमाला रिझल्ट माहीत होता...
"तसं काही नाहीये डॉक्टर!"
"तरी पण ...माझ्या खात्री करता करून पाहू..."
थोड्या वेळाने डॉक्टरांनी स्वतः तिच्याजवळ येत तिला सांगितलं,
"तुम्ही आई होणार आहात!"
ते चार शब्द...तिच्या कानाला झेपलेच नाहीत! गेल्या दहा वर्षांत हे चार शब्द ऐकायला ती आसुसलेली होती...मटकन खाली बसली आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली,
" I can't believe it!!"
घरी आल्यावर तिने महेशला सांगितले आणि तो ऑफिसच्या फॉर्मल ड्रेस मध्ये लहान मुलासारखा उड्या मारू लागला...सुमाला उचलून गोल गिरकी घेत त्याने आपला आनंद साजरा केला...
आता दोघे अनपेक्षितपणे येणाऱ्या आपल्या बाळाची आतुरतेने वाट पहात होते... महेश सुमाला फुलाप्रमाणे जपत होता...तिला जरा त्रास होऊ लागला की हा लगेच तिला घेऊन डॉक्टरांना घेऊन जायचा..एक दिवस दोघेही रुटीन चेकअप साठी हॉस्पिटलमध्ये आले होते...सुमाला पाचवा महिना चालू होता...आता तिचं बाळ लाथ मारून आपलं अस्तित्व दाखवून देत होतं... सुमा टेबलवर झोपली होती...सोनोग्राफी चालू होती...डॉक्टर एका हातात प्रोब घेऊन एकीकडे स्क्रीनवर पाहत त्या दोघांना...बाळाचे एक एक अवयव दाखवत होते....दोघेही बाळाला मन लावून पाहत होते...अधून मधून एकमेकांवर कटाक्ष टाकून आपला आनंद वाटून घेत होते...अचानक डॉक्टर बोलता बोलता गप्प झाले...त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन रिपोर्ट घ्यायला सांगितलं...
रिपोर्ट निर्मल नव्हता...
"बाळाच्या मेंदूचा काही
भाग अविकसित आहे...मेडिकल टर्म्स मध्ये सांगायचं झालं तर याला anencephaly म्हणतात ...अशी बाळं जगत नाहीत..त्यामुळे जन्माला आल्यानंतर काही दिवसांत किंवा काही तासांतच बाळ दगावेल!"
अशी माहिती देत डॉक्टरांनी अशा व्यंग असलेल्या बाळाला जन्म देण्यापेक्षा सिझेरियन करून बाळाला काढून टाकायचा सल्ला दिला...दोघेही सुन्नपणे एकमेकांना पाहत होते...किती वर्षांपासून त्यांना बाळ हवं होतं..इतक्या वर्षांनी पाहिलेले स्वप्न एका क्षणात धुळीस मिळाले होते... अचानक बाळाने पोटातून दिलेल्या लाथेने सुमा भानावर आली...तिने पोटावरून हात फिरवला..आणि निर्धाराने ती डॉक्टरकडे पाहत ती म्हणाली,
"डॉक्टर असं असेल तरी मला माझ्या बाळाला जन्म द्यायचाय!"
"मी तुमच्या भावना समजू शकतो...पण तुम्ही हे सगळं भावनेच्या आहारी जाऊन बोलताय...या अशा बाळाला जन्म द्यायचा काय उपयोग? आणि त्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या नवऱ्याला किती त्रास होईल...किती मनःस्ताप होईल...याची थोडी कल्पना करून पाहा...माझं ऐका... मी काय कुठलाही डॉक्टर तुम्हाला हेच सांगेल...हवं तर तुम्ही शांतपणे विचार करून नंतर माझ्याकडे या! यांना जरा समजवा!"
महेश कडे पाहत डॉक्टर म्हणाले...महेश काही बोलणार...तोच सुमाने त्याला हात दाखवत गप्प व्हायला सांगितले आणि ती डॉक्टरांना म्हणाली,
"माझा निर्णय झालाय डॉक्टर... मी जन्म देणार माझ्या बाळाला...इतके दिवस वाट पाहिली या गोष्टीची...आई जन्म देण्यासाठी असते...जीव घेण्यासाठी नाही...तुम्ही ज्या त्रासाबद्दल सांगताय त्याची कल्पना आहे मला...जन्माला आल्यानंतर त्याचं जे होईल, ते किती वेळ जगेल हे माझ्या हातात नसलं तरी माझ्या पोटात ते अजून पाच महिने कसं सुरक्षित राहील ते माझ्या हातात आहे ना? माझा तो अधिकार हिरावून घेऊ नका प्लिज...मला आई व्हायचंय!! आणि कोण म्हणतं त्याचा जन्माला येऊन काही उपयोग नाही? मी त्याचं आयुष्य व्यर्थ जावू देणार नाही...मृत्यूनंतर त्याचे अवयव दुसऱ्या कोणाच्या कामी कसे येतील ते पाहिल... तो जगातला सर्वात कमी वयाचा अवयव दाता होईल...जाता जाता आणखी दोघातिघांना आयुष्य देऊन जाईल!त्यांच्या रुपात मी त्याला जिवंत ठेवील..."
बोलता बोलता तिने आवंढा गिळला...आणि पाणावलेले डोळे पुसले...डॉक्टर आणि महेश तिच्याकडे पाहतच राहिले..डॉक्टर थोड्या वेळाने आपला चष्मा काढून डोळे पुसत म्हणाले,
"मी निशब्द झालोय! तुम्ही खूप धीरोदात्तपणे हा निर्णय घेतलाय...तुमच्यासारखी आई प्रत्येक बाळाला मिळो!"
तुमच्या आईपणाला माझं दंडवत!! माझ्या 15 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये अशी केस पहिलीच आहे!काय बोलू ?"
दोघेही घरी गेली...
महेश पूर्वीप्रमाणेच सुमाची काळजी घेत होता...तिचे डोहाळे पुरवत होता...तिचं आईपण त्याने डोहाळे जेवणाचा मोठा कार्यक्रम ठेवून दणक्यात साजरं केलं...दोघांनी बाळाचं नावदेखील ठरवलं होतं...
आणि तो दिवस आला...सुमाला प्रसूती वेदना होत होत्या...यथावकाश प्रसूती झाली....त्यांना मुलगा झाला होता...सगळ्यांनी बाळाला पाहून तोंडात बोट घातलं...बाळाला डोक्याचा समोरचा आणि मधला भाग नव्हता...आणि ते खूप विचित्र दिसत होते....पण सुमा आणि महेश तितकेच खुश होते...जितके बाकीचे आई बाबा असतात आपल्या बाळाला पाहून...
त्यांनी आपलं दुःख बाजूला सारून आपल्या बाळाचं आनंदाने स्वागत केलं होतं... महेशने लगोलग एका फोटोग्राफर कडून तिघांचं 'फॅमिली फोटोशूट' देखील करून घेतलं...ह्या अन त्या सगळ्या पोझ घेऊन झाल्या...पाच पन्नास फोटो घेऊन झाल्यावरच दोघांचे समाधान झाले...दोघांनी आपल्या बाळाचं नाव पण ठेवलं... "प्रतीक"
सुमा त्याला एका सेकंदासाठी देखील नजरेआड होऊ देत नव्हती...त्याच्या प्रत्येक हालचालीवर तिचं बारीक लक्ष होतं... रात्री झोपताना देखील तिने त्याला आपल्या कुशीत घेतले होते....
आणि दुसऱ्या दिवशी अखेर ती वेळ आली...निरोप घ्यायची!
दुपारी बाळाने अखेरचा श्वास घेतला...सुमाने त्याला छातीशी कवटाळून हंबरडा फोडला...महेशने भरल्या डोळ्यांनी कसं बसं ऑर्गन ट्रान्सप्लांट वाल्या लोकांना फोन करून कळवलं...तसं त्यांची टीम आधी कल्पना दिल्यामुळे तयारच होती...5-10 मिनिटांत पोचणार होती...तोवर आईच्या कुशीत बछडा विसावला होता...आणि ती वाघिण आपल्या बाळाला अखेरचा निरोप देत म्हणाली,
"बाळा पुढच्या जन्मी परत तुला माझ्याच पोटी जन्म घ्यायचाय...लक्षात ठेव...ही आई तुझी वाट पाहिल..."
एव्हाना टीम तिथं पोचली...आणि या माउलीने मनावर दगड ठेऊन आपला काळजाचा तुकडा डॉक्टरांना सुपूर्द केला... बाळाचे हृदय, यकृत आणि किडन्या दान करण्यात आल्या होत्या...आणि प्रतीक जाता जाता तीन लोकांना नवजीवन देऊन गेला होता...आणि महेश आणि सुमाला हॉस्पिटलमध्येनवीन ओळख मिळाली होती..."प्रतीकचे आई बाबा!"
या घटनेला आता वर्ष होत आलं होतं...महेश काहीसा सावरला असला तरी सुमा मात्र अजूनही आपल्या लेकाची आठवण काढून आसवं गाळायची...
एक दिवस रविवारी बसली असताना तिला घराबाहेर पावलांची चाहूल झाली...दारात 14-15 वर्षांचा किडकीडा, उंच मुलगा उभा होता...तिला पाहून तो तिच्या पाया पडला...तिला काही समजायच्या आतंच तो बोलू लागला...
"तुम्ही प्रतिकची आई ना?"
"हो पण..."ती आवाक झाली होती..
"मी पियुष...मला लहानपाणी पासून हृदयाला छेद आहे...गेले एक दोन वर्षे आजारी होतो..डॉक्टरांनी हार्ट ट्रान्सप्लांटचा उपाय सुचवला होता...पण कोणी donor मिळत नव्हता..मिळाला तरी ब्लड ग्रुप match होत नव्हता...शेवटी मी काय आई , बाबा, सगळ्यांनीच माझ्या जगण्याची आशा सोडली होती...पण डॉक्टरांनी शेवटी donor मिळाला म्हणून सांगितलं...हे हृदय प्रतीकचं आहे!मी रुटीन चेकअप साठी गेलो...तेव्हा मी चौकशी केली...आणि तुमचा पत्ता मिळाला....तुमच्यामुळे आज जिवंत आहे...मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही!"
तो भारावला होता...सुमाने जणू आपलंच बाळ परत आलंय असं समजून त्याला मिठी मारली...दोघेही रडत होती...थोड्या वेळाने पियुष म्हणाला,
"मी तुम्हाला आई म्हणालं तर चालेल का?तुम्हीच माझी आई आहात."
तिने डोळे पुसले आणि मानेनेच हो म्हणून खुणावत संमती दिली..
तेव्हापासून दर रविवारी न चुकता पियुष आपल्या 'या' आईला भेटायला येतो...दिवसभर तिच्याकडून आपले लाड पुरवून घेतो...सुमा तो आला की खूष असते...दिवसभर घरात "आई, आई..." चा घोष चालू असतो आणि संध्याकाळी परत आपल्या घरी जातो...सुमाला पुढचे आठ दिवस जगण्याची नवीन आशा देऊन....आता महेश आणि सुमा या धक्क्यातून सावरले आहेत...आणि त्यांनी एका गोंडस परीला दत्तक घेतलंय!
Saturday, June 16, 2018
प्रतीक ची आई......
Wednesday, June 13, 2018
Tuesday, June 12, 2018
Monday, June 11, 2018
Sunday, June 10, 2018
"एक चुटकी ज़हर रोजाना"
आरती नामक एक युवती का विवाह हुआ और वह अपने पति और सास के साथ अपने ससुराल में रहने लगी। कुछ ही दिनों बाद आरती को आभास होने लगा कि उसकी सास के साथ पटरी नहीं बैठ रही है। सास पुराने ख़यालों की थी और बहू नए विचारों वाली।
आरती और उसकी सास का आये दिन झगडा होने लगा।
दिन बीते, महीने बीते. साल भी बीत गया. न तो सास टीका-टिप्पणी करना छोड़ती और न आरती जवाब देना। हालात बद से बदतर होने लगे। आरती को अब अपनी सास से पूरी तरह नफरत हो चुकी थी. आरती के लिए उस समय स्थिति और बुरी हो जाती जब उसे भारतीय परम्पराओं के अनुसार दूसरों के सामने अपनी सास को सम्मान देना पड़ता। अब वह किसी भी तरह सास से छुटकारा पाने की सोचने लगी.
एक दिन जब आरती का अपनी सास से झगडा हुआ और पति भी अपनी माँ का पक्ष लेने लगा तो वह नाराज़ होकर मायके चली आई।
आरती के पिता आयुर्वेद के डॉक्टर थे. उसने रो-रो कर अपनी व्यथा पिता को सुनाई और बोली – “आप मुझे कोई जहरीली दवा दे दीजिये जो मैं जाकर उस बुढ़िया को पिला दूँ नहीं तो मैं अब ससुराल नहीं जाऊँगी…”
बेटी का दुःख समझते हुए पिता ने आरती के सिर पर प्यार से हाथ फेरते हुए कहा – “बेटी, अगर तुम अपनी सास को ज़हर खिला कर मार दोगी तो तुम्हें पुलिस पकड़ ले जाएगी और साथ ही मुझे भी क्योंकि वो ज़हर मैं तुम्हें दूंगा. इसलिए ऐसा करना ठीक नहीं होगा.”
लेकिन आरती जिद पर अड़ गई – “आपको मुझे ज़हर देना ही होगा ….
अब मैं किसी भी कीमत पर उसका मुँह देखना नहीं चाहती !”
कुछ सोचकर पिता बोले – “ठीक है जैसी तुम्हारी मर्जी। लेकिन मैं तुम्हें जेल जाते हुए भी नहीं देख सकता इसलिए जैसे मैं कहूँ वैसे तुम्हें करना होगा ! मंजूर हो तो बोलो ?”
“क्या करना होगा ?”, आरती ने पूछा.
पिता ने एक पुडिया में ज़हर का पाउडर बाँधकर आरती के हाथ में देते हुए कहा – “तुम्हें इस पुडिया में से सिर्फ एक चुटकी ज़हर रोज़ अपनी सास के भोजन में मिलाना है।
कम मात्रा होने से वह एकदम से नहीं मरेगी बल्कि धीरे-धीरे आंतरिक रूप से कमजोर होकर 5 से 6 महीनों में मर जाएगी. लोग समझेंगे कि वह स्वाभाविक मौत मर गई.”
पिता ने आगे कहा -“लेकिन तुम्हें बेहद सावधान रहना होगा ताकि तुम्हारे पति को बिलकुल भी शक न होने पाए वरना हम दोनों को जेल जाना पड़ेगा ! इसके लिए तुम आज के बाद अपनी सास से बिलकुल भी झगडा नहीं करोगी बल्कि उसकी सेवा करोगी।
यदि वह तुम पर कोई टीका टिप्पणी करती है तो तुम चुपचाप सुन लोगी, बिलकुल भी प्रत्युत्तर नहीं दोगी ! बोलो कर पाओगी ये सब ?”
आरती ने सोचा, छ: महीनों की ही तो बात है, फिर तो छुटकारा मिल ही जाएगा. उसने पिता की बात मान ली और ज़हर की पुडिया लेकर ससुराल चली आई.
ससुराल आते ही अगले ही दिन से आरती ने सास के भोजन में एक चुटकी ज़हर रोजाना मिलाना शुरू कर दिया।
साथ ही उसके प्रति अपना बर्ताव भी बदल लिया. अब वह सास के किसी भी ताने का जवाब नहीं देती बल्कि क्रोध को पीकर मुस्कुराते हुए सुन लेती।
रोज़ उसके पैर दबाती और उसकी हर बात का ख़याल रखती।
सास से पूछ-पूछ कर उसकी पसंद का खाना बनाती, उसकी हर आज्ञा का पालन करती।
कुछ हफ्ते बीतते बीतते सास के स्वभाव में भी परिवर्तन आना शुरू हो गया. बहू की ओर से अपने तानों का प्रत्युत्तर न पाकर उसके ताने अब कम हो चले थे बल्कि वह कभी कभी बहू की सेवा के बदले आशीष भी देने लगी थी।
धीरे-धीरे चार महीने बीत गए. आरती नियमित रूप से सास को रोज़ एक चुटकी ज़हर देती आ रही थी।
किन्तु उस घर का माहौल अब एकदम से बदल चुका था. सास बहू का झगडा पुरानी बात हो चुकी थी. पहले जो सास आरती को गालियाँ देते नहीं थकती थी, अब वही आस-पड़ोस वालों के आगे आरती की तारीफों के पुल बाँधने लगी थी।
बहू को साथ बिठाकर खाना खिलाती और सोने से पहले भी जब तक बहू से चार प्यार भरी बातें न कर ले, उसे नींद नही आती थी।
छठा महीना आते आते आरती को लगने लगा कि उसकी सास उसे बिलकुल अपनी बेटी की तरह मानने लगी हैं। उसे भी अपनी सास में माँ की छवि नज़र आने लगी थी।
जब वह सोचती कि उसके दिए ज़हर से उसकी सास कुछ ही दिनों में मर जाएगी तो वह परेशान हो जाती थी।
इसी ऊहापोह में एक दिन वह अपने पिता के घर दोबारा जा पहुंची और बोली – “पिताजी, मुझे उस ज़हर के असर को ख़त्म करने की दवा दीजिये क्योंकि अब मैं अपनी सास को मारना नहीं चाहती … !
वो बहुत अच्छी हैं और अब मैं उन्हें अपनी माँ की तरह चाहने लगी हूँ!”
पिता ठठाकर हँस पड़े और बोले – “ज़हर ? कैसा ज़हर ? मैंने तो तुम्हें ज़हर के नाम पर हाजमे का चूर्ण दिया था … हा हा हा !!!”
"बेटी को सही रास्ता दिखाये,
माँ बाप का पूर्ण फर्ज अदा करे"
Wednesday, June 6, 2018
मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
1) नीट आँनलाईन फाँर्म प्रिंट
2) नीटप्रवेश पत्र
3) नीट मार्क लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8) रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
11) आधार कार्ड
12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड
मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2019 पर्यत लागू)
कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे
पत्नी - पूरे टाइम मोबाइल में चिपके रहते हो। कम से कम छुट्टी के दिन तो कुछ वक्त मेरे लिए भी निकाल लिया करो 😡
पति ने मोबाइल चार्जिंग में लगाया और बोला - ठीक है बेगम...आज का पूरा दिन तुम्हारे नाम 😘
फिर पति ने घूम कर पूरे घर का जायज़ा लिया और पत्नी से बोला...
--- आज खाने में बाई का नहीं बल्कि तुम्हारे हाथ का खाने का मन है 😍
--- देखो घर में हर तरफ जाले लगे हैं 😱 इनको साफ कर दो।
--- एक कप बढ़िया कॉफ़ी पीने का मन है...ज़रा बना दो 😋
--- इस महीने तुमने कितने की शॉपिंग करी बताओ 🤔
--- किटी पार्टी में कितना खर्चा किया 😒
--- मेरी 2-3 शर्ट के बटन टूट गए हैं...उनको ठीक कर दो ☹
पत्नी - ये लो जी 🙄...आपका मोबाइल फुल चार्ज हो गया।
😒😒
😂😂😂😂😂😂😂😂
ऐसे ही जोक्स पाने के लिये इन्स्टॉल किजीए इस अँप को
https://drive.google.com/open?id=19BCHaN1j-xfueC0UynBB9DF2SNVaZhAY